Thursday, 16 July 2015

तो आणि ती


ते सगळे खर्च वाटून घ्यायचे . मोजून मापून , विचार करून, पै -पै  चा हिशीब ठेवायला तिला फार आवडायचं . ती त्याच्या पेक्षा कमी नाही ह्याची हळुवार जाणीव तिला हलकेच समाधान देत रहायची . तो पण तिच्या समर्थ असण्याचा आनंद व्यक्त करायचा . आपण इतर पुरुषांसारखे नसल्याचा अभिमान बाळगायचा .
रात्रीच्या चांदण्यात आकाशाकडे टक लावून पाहणाऱ्या तिला न्ह्याहाळताना त्याला एकच बोच सतत लागून राहायचीसंसार वेलीवरून गळून गेलेल्या कळ्या आजही त्याला सतवायच्या. आकाशातल्या ताऱ्यांमध्ये तो त्यांना नकळत शोधायचा . परिपूर्ण होता होता राहिलेल्या अपुऱ्या प्रपंचाकडे मागे वळून पाहताना त्याला त्रास व्हायचा . पण  थोडाच काळ
" तो किंवा ती" हा डॉक्टरांचा प्रश्नं आठवला की त्याच हळवं मन स्थिर व्हायचं .

 तिच्या बाबांचे कृतार्थ  डोळे आठवायचे आणि हा झालेला बाबा शांत होऊन जायचा